Friday, 31 July 2020

दही खाण्याचे 'हे' आहेत फायदे

😍 *दही खाण्याचे 'हे' आहेत फायदे*

😋 आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी शरीराला पिष्टमय पदार्थांसोबतच स्निग्ध पदार्थांचे सेवन करणेही आवश्यक असते. दुग्धजन्य पदार्थांमध्ये स्निग्धता भरपूर असते.

🍚 यातीलच एक महत्वाचा पदार्थ म्हणजे दही होय. दह्याच्या सेवनामुळे शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळतात.

🤔 *दही सेवनाचे फायदे :*

▪️ *पोषक घटक :* प्रोटीन, कैल्शियम, राइबोफ्लेविन, विटमिन B6, विटमिन B12 यांसारखे शरीराला लाभ देणारे घटक दह्यामध्ये असतात.

▪️ *मजबूत सांधे :* शरीरातील सांध्यांना मजबूत ठेवण्याचे काम दह्याच्या सेवनामुळे शक्य होते. यामुळे शरीरातील मांसपेशीलादेखील ऊर्जा मिळते.

▪️ *सुंदर केस :* अंघोळीपूर्वी केसांना दह्याने मालिश केल्यास आणि काही काळाने केस धुतल्यास केस मुलायम आणि चमकदार बनतात.

▪️ *हाडांना मजबुती मिळते :* दह्यामध्ये विपुल प्रमाणात कॅल्शिअम असल्यामुळे हे कॅल्शिअम शरीरातील हाडांना मजबूत ठेवण्याचे काम करते.

▪️ *तोंडातील छाले मिटतात :* अनेकांना तोंडामध्ये नियमित छाले होतात किंवा तोंड येते. मात्र दही आणि मध यांचे समप्रमाणात सेवन केल्यास छाल्यांचा त्रास दूर होतो.

1 comment: