Wednesday 12 August 2020

मालक असेच होता येत नाही...


एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचे मालक आपल्या अती महत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत एका ठिकाणी तातडीच्या मीटिंगला निघाले होते. मोठी आलिशान गाडी होती आणि प्रवासही साधारण तीन चार तासांचा होता. सर्वजण सकाळी लवकर निघाले होते.

   गाडी वाटेत आल्यावर ड्रायव्हर च्या असे लक्षात आले की मागील एक चाक पंक्चर आहे, ड्रायव्हरने गाडी लगेच रस्त्याच्या बाजुला घेतली आणि सर्वांना उतरायला सांगितले. सर्वजण जरा खुश झाले. कारण सकाळी लवकर निघाले होते आणि मध्ये कुठेच थांबले नव्हते म्हणून ब्रेक हवाच होता. मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले, कोणी जवळच्या ढाब्यावर जाऊन सिगरेट ओढू लागले तर कोणी झुडपाच्या आड गेले. अर्ध्यातासा नंतर सर्वजण एकत्र जमले, सर्व टीम एकत्र आली पण मालक मात्र दिसले नाही. सर्वजण मालकांना शोधू लागले पण मालक कुठेच दिसले नाही. दहा मिनिटांनी सर्वजण गाडी जवळ आले , बघतात तर काय मालकांच्या शिर्टचे दोन्ही हात कोपरापर्यंत वर होते, चेहरा सगळा घामेघुम झालेला, हातात स्टेपनी चे चाक आणि चेहऱ्यावर स्मिथ हास्य ठेवून ड्रायव्हरला पंक्चर चाक बदलण्यासाठी मदत करताना दिसले आणि तिथेच सर्व उच्च अधिकाऱ्यांना पहिला धडा भेटला...
 थोर होण्यासाठी तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील समस्या माहीत करून घ्याव्या लागतात. नुसते आदेश सोडून अधिकारी बनू शकता, पण मालक नाही होता येत. त्या महान व्यक्तिमत्व असलेल्या  उद्योगपती मालकांचे नाव होते. "श्री. रतन टाटा."
     नाशिक येथे नेल्को ची टीम घेऊन जाताना खरोखर घडलेला प्रसंग...

3 comments: