Saturday 22 August 2020

तिन्ही सैन्यदलांचा सॅल्यूट वेगळा कसा असतो?

आपल्या भारत देशाच्या संरक्षणासाठी तीन महत्त्वाचे सैन्यदल कार्यरत आहेत ते म्हणजे आर्मी, नेवी आणि एअरफोर्स.
आर्मी म्हणजेच भूदल, नेवी म्हणजेच नौदल आणि एअरफोर्स म्हणजेच वायुदल. या तीनही संरक्षण सैन्यदलांचे सेल्यूट करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि ती कशी वेगळी आणि ते कश्या प्रकारे सेल्युट करतात आज त्याबद्दलच आज आपण जाऊन घेणार आहोत.

भारतात आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अर्थात भूदल, नौदल, वायुदल अशी तीन वेगवेगळी सैन्यदलं असून त्यांच्या कार्यपद्धतीत फरक आहे.
मात्र याव्यतिरिक्त या तीनही सैन्यदलाच्या सॅल्यूट करण्याच्या पद्धतीतदेखील विभिन्नता आढळते. जाणून घेऊयात सॅल्यूटच्या या पद्धतींविषयी.

 आर्मी/भूदल : 
आर्मीचे जवान, अधिकारी हाताचे सर्व बोटे चिकटवून मधले बोट कपाळाच्या बाजूला टेकवून सॅल्यूट देतात. हे करत असताना त्यांचा हात 180 अंशामध्ये वळलेला असतो.

नेव्ही/नौदल :
नौदलाचे जवान, अधिकारी सॅल्यूट करताना 90 अंशात हात वळवून तळहाताची दिशा जमिनीकडे ठेवून हात कपाळाच्या बाजूला टेकवतात. जहाजदुरुस्ती करताना खराब झालेले हात दिसू नयेत म्हणून असे केले जाते.

एअरफोर्स/वायुदल :
वायुदलात जवान, अधिकारी सॅल्यूट करताना हात 45 अंशात वळवून कपाळाच्या बाजूला टेकवतात. थोडासा तिरका हात असल्यामुळे विमान उड्डाणाशी याचा संदर्भ लावला जातो. 2006 मध्ये एअरफोर्ससाठी नवीन नियम आले आहेत.

2 comments: